Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांना मोठा दणका, शिवडी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 16:37 IST

Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना खूप मोठा दणका शिवडी कोर्टाने दिला आहे. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुंबई महानगर दंडाधिकारीनी संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि कलम 499, 500 साठी वॉरंट जारी केले. 

महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला आहे. शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते.

 

 

टॅग्स :संजय राऊतकिरीट सोमय्यान्यायालय