मुंबईतल्या सांडपाण्याचा पुन्हा वापर होणार! ७ प्रकल्पांच्या कामाला आजपासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 07:05 AM2023-01-20T07:05:26+5:302023-01-20T07:06:23+5:30

मुंबईतील वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप आणि वर्सोवा याठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार

Sewage in Mumbai will be reused! Work on 7 projects will start from today | मुंबईतल्या सांडपाण्याचा पुन्हा वापर होणार! ७ प्रकल्पांच्या कामाला आजपासून सुरुवात

मुंबईतल्या सांडपाण्याचा पुन्हा वापर होणार! ७ प्रकल्पांच्या कामाला आजपासून सुरुवात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत दररोज लाखो लिटर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. मुंबईतील वरळी, वांद्रे, मालाड, घाटकोपर, धारावी, भांडुप आणि वर्सोवा याठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून २,४६४ दश लक्ष लिटर पाण्यावर दररोज प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सांडपाण्याचा पुन्हा वापर करणे शक्य होणार आहे.

पालिकेचे मलजल प्रक्रिया केंद्र अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडला होते. पालिकेने २००२ साली याबाबतचा आराखडा तयार केला होता तर २००७ पासून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती. मात्र जागेची कमतरता, पर्यावरणविषयक मंजुरी, प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेवरील कांदळवने, वेळोवेळी बदलणारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची मानके यामुळे हा प्रकल्प रखडला. २०१८ साली पालिकेने प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेला सुरुवात केली. तीनवेळा फेरनिविदा काढण्यात आल्या. पालिकेने अखेर मे २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण केली व कंत्राटदार नियुक्त केले.

अशी होईल प्रक्रिया

सध्या मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया करून खाडी किंवा समुद्रात सोडले जाते, त्यामुळे काही प्रमाणात प्रदूषण होते. मलजल प्रक्रिया केंद्राद्वारे सांडपाण्यावर तीन स्तरांत प्रक्रिया केली जाईल, त्यातून बायोगॅस निर्माण होईल. या बायोगॅस ऊर्जेमुळे पर्यावरणाचा ऱ्हासदेखील कमी होणार आहे.

 

Web Title: Sewage in Mumbai will be reused! Work on 7 projects will start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.