विमानतळावरील सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना ८,९०० रुपये पगारवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:55 AM2019-03-06T04:55:20+5:302019-03-06T04:55:25+5:30

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध सेवा पुरवणाऱ्या सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व इतर सुविधा वाढवणारा करार नुकताच करण्यात आला.

Service Provider Employees At Airport Receipts Rs 8,900 | विमानतळावरील सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना ८,९०० रुपये पगारवाढ

विमानतळावरील सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना ८,९०० रुपये पगारवाढ

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध सेवा पुरवणाऱ्या सेवा पुरवठादार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व इतर सुविधा वाढवणारा करार नुकताच करण्यात आला. या करारानुसार कर्मचाºयांना पुढील ३ वर्षांसाठी ४,५०० रुपये ते ८,९०० रुपयांपर्यंत वेतनवाढ मिळेल. याशिवाय डीए व १ लाख रुपयांचा वैद्यकीय विमाही मिळणार आहे.
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस संजय कदम व संतोष कदम यांनी पगारवाढीसंदर्भात कंपन्यांसोबत करार केला आहे. त्यानुसार क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिस प्रा. लि. व प्रथमेश टेक्नो वर्क फोर्स या दोन कंपन्यांमधील कर्मचाºयांना या कराराचा लाभ मिळेल. या पगारवाढीमुळे कर्मचाºयांचा पगार दरमहा १८ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे.

Web Title: Service Provider Employees At Airport Receipts Rs 8,900

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.