Senior communist leader Rosa Deshpande passed away | ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश

ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे कालवश

मुंबई - ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या माजी खासदार कॉम्रेड रोझा देशपांडे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांनी दादर येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षांच्या होत्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांच्या त्या कन्या होत्या.

रोझा देशपांडे यांनी पाचव्या लोकसभेमध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्येही सक्रिय होत्या. दरम्यान, त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले आहे. रोझा देशपांडे यांच्या पश्चात कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

English summary :
Senior communist leader Rosa Deshpande passed away

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Senior communist leader Rosa Deshpande passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.