Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 19:51 IST

चारकोप पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली

 

मुंबई -  ऍक्टिव्हाच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवली,चारकोप येथे घडली. चारकोप पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. महंतू शर्मा (५९) असे मृताचे नाव असून ते शनिवारी रात्री कांदिवली येथील  जुना लिंक रोड, गणेश नगर येथून पायी जात असताना चालकाने त्याच्या ताब्यातील ऍक्टिव्हा भरधाव व निष्काळजीपणे चालवून शर्मा यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला.

टॅग्स :मुंबईअपघात