Join us

तुमचं काम चित्रपट दाखवणं, खाद्यपदार्थ विकणं नव्हे; हायकोर्टाची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 13:40 IST

मल्टिप्लेक्स असोसिएशनची मुंबई हायकोर्टाकडून कानउघाडणी

मुंबई: तुमचं काम चित्रपट दाखवणं आहे. खाद्यपदार्थ विकणं नव्हे, अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं मल्टिप्लेक्स असोसिएशनचे कान उपटले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही चित्रपटगृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ आणू देत नाही, असा युक्तिवाद मल्टिप्लेक्स असोसिएशनकडून करण्यात आला. यावर सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ बाळगतात. तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का? असा प्रश्न विचारत न्यायालयानं मल्टिप्लेक्स असोसिएशनला झापलं. चित्रपटागृहात बाहेरील खाद्यपदार्थांवर असलेल्या बंदी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयानं मल्टिप्लेक्स असोसिएशनला चांगलंच फैलावर घेतलं. मल्टिप्लेक्स ही खासगी मालमत्ता आहे. त्यासाठी नियम तयार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असा युक्तिवाद मल्टिप्लेक्स असोसिएशनकडून करण्यात आला. यावरुनही न्यायालयानं मल्टिप्लेक्स असोसिएशनचे कान टोचले. तुमचं काम चित्रपट दाखवमं आहे. खाद्यपदार्थ विकणं नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं मल्टिप्लेक्स असोसिएशनला सुनावलं आहे.  

टॅग्स :सिनेमानाटक