Join us  

चिंताजनक! दुसऱ्या लाटेत आतापर्यंत, २५ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 7:17 AM

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत जीव गमवावा लागलेल्या १२० डाॅक्टरांपैकी राज्यातील सर्वाधिक ५० डॉक्टर हे बिहारमधील आहेत.

  मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काेराेनामुळे देशभरातील १२० डॉक्टरांचा मृत्यू झाला. यात राज्यातील तब्बल २५ डाॅक्टरांचा समावेश आहे.

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत जीव गमवावा लागलेल्या १२० डाॅक्टरांपैकी राज्यातील सर्वाधिक ५० डॉक्टर हे बिहारमधील आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष (महाराष्ट्र) डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गाची तीव्रता डॉक्टरांमध्ये ही अधिक आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यू झालेल्या डॉक्टरांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुण डॉक्टरांचे आहे. मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आयएमएच्या राष्ट्रीय स्तरावरील शाखेने पुढाकार घेऊन रिलीफ फंड तयार करुन आतापर्यंत १४ मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना १ कोटी १४ लाख रुपयांची मदत केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे महासचिव डॉ. जयेश लेले यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून अजूनही मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना अपेक्षेप्रमाणे मदत केली जात नाही. याविषयी, राज्याच्या शाखेने वारंवार पाठपुरावा करुन ही पदरी निराशा आली. सरकारकडून खासगी आणि सरकारी डॉक्टरांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आराेपही त्यांनी केला. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसऑक्सिजनहॉस्पिटलडॉक्टरकोरोनाची लस