मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना अपेक्षेप्रमाणे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. आता २८ फेबु्रवारीपर्यंत त्यांच्याकडे राज्याची धुरा असेल. दोन टप्प्यांत सलग सहा महिने मुदतवाढ मिळणारे गेल्या काही वर्षांतील ते पहिलेच पोलीस महासंचालक आहेत.१९८२च्या आयपीएसच्या बॅचचे अधिकारी असलेले पडसलगीकर हे ३० जूनपासून राज्य पोलीस दलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ३१ आॅगस्टला ते निवृत्त होत असताना त्यांना राज्य सरकारने पहिल्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ती शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना पुन्हा तीन महिने वाढवून दिले.
पडसलगीकर यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 06:17 IST