Join us

इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंतचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 06:34 IST

CoronaVirus News : संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करतील.

मुंबई :  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.इंग्लंडमधील कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली असून, ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे. संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करतील.

अशा आहेत सूचना- जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील २८ दिवस करण्यात येईल. या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल.- सर्व निकट सहवासितांना ते पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून पाचव्या ते दहाव्या दिवसादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. जे कुणी २५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडवरून भारतात आले आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या जिल्ह्याच्या / महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस