एकाच्या शोधात दुस-यालाही मिळाले घर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:19 IST2018-03-28T01:19:36+5:302018-03-28T01:19:36+5:30

वडाळामधून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय मुलाच्या शोधासाठी गुन्हे शाखेने तपास सुरु केला

In search of one, another person got home .. | एकाच्या शोधात दुस-यालाही मिळाले घर..

एकाच्या शोधात दुस-यालाही मिळाले घर..

मुंबई : वडाळामधून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय मुलाच्या शोधासाठी गुन्हे शाखेने तपास सुरु केला. तपासाअंती गुन्हे शाखेच्या पथकाला वाशीमध्ये एका मुलासोबत हा मुलगा भिक मागताना दिसला. पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या चौकशीत दुसराही मुलगा वाशीमधून एक महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. अशात एकाच्या शोधात दुसºयाही मुलाची त्याच्या कुटुंबियांसोबत भेट घालण्यास पोलिसांना यश आले आहे. 

वडाळा टी.टी परिसरात १२ वर्षीय मुलगा कुटुंबियांसोबत राहतो. ३ मार्च रोजी मुलगा बेपत्ता झाला. शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबियांनी वडाळा टी.टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.  बरेच दिवस उलटूनही मुलाचा थांगपत्ता न लागल्याने गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने याचा तपास सुरु केला.  तपासात वाशीमध्ये हा मुलगा भिक मागत असताना दिसला. त्याच्यासोबत आणखीन एक १२ वर्षाचा मुलगा होता. गुन्हे शाखेने दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. चौकशीत दुसरा मुलगाही महिनाभरापासून वाशीमधूनच बेपत्ता असल्याचे समोर आले. दोघांनाही त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Web Title: In search of one, another person got home ..