Join us

सर्व शाळा, महाविद्यालयांना २७ जुलैला सुट्टी जाहीर; रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय

By सीमा महांगडे | Updated: July 26, 2023 21:15 IST

गुरुवार, २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला बुधवारी रात्री ८ ते गुरुवारी दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे.

तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊस