म्हाडाच्या भूखंडांवर शाळा, महाविद्यालयासह रिटेल मार्केट; नोंदणीकृत कंत्राटदारांकडून म्हाडाने ऑनलाइन निविदा मागविल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:23 IST2025-12-11T12:21:37+5:302025-12-11T12:23:02+5:30
मालाड-मालवणी येथील ६ भूखंड शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, खेळाचे मैदान यासारख्या सुविधांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

म्हाडाच्या भूखंडांवर शाळा, महाविद्यालयासह रिटेल मार्केट; नोंदणीकृत कंत्राटदारांकडून म्हाडाने ऑनलाइन निविदा मागविल्या
मुंबई : मालाड-मालवणी, उन्नतनगर-गोरेगाव, चारकोप-कांदिवली, टागोरनगर-विक्रोळी, कन्नमवारनगर-विक्रोळी, गोराई, आकुर्ली, विनोबा भावेनगर- कुर्ला, मुलुंड (पूर्व) या वसाहतीतील १६ सुविधा भूखंड देण्यासाठी नोंदणीकृत कंत्राटदारांकडून म्हाडाने ऑनलाइन निविदा मागविल्या आहेत. हे भूखंड विविध कारणांकरिता आरक्षित असून, म्हाडा वसाहतीतील या भूखंडांवर शाळा, महाविद्यालयासह रिटेल मार्केट उभे राहणार आहे. दरम्यान, ले-आउटनुसार ३२ चौरस मीटर ते ७,१६० चौरस मीटर क्षेत्रफळाचे हे भूखंड आहेत.
आई-बाप होणे महागले! आयव्हीएफ उपचारांचा कुटुंबांवर मोठा आर्थिक बोजा; घ्यावे लागते कर्ज
मालाड-मालवणी येथील ६ भूखंड शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, खेळाचे मैदान यासारख्या सुविधांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. उन्नतनगर-गोरेगाव पश्चिम येथील १ भूखंड शाळेसाठी, चारकोप-कांदिवली येथील २ भूखंड अनुक्रमे रिटेल मार्केट व सुविधा भूखंडासाठी, विनोबा भावेनगर- कुर्ला येथील १ भूखंड समाजकल्याण केंद्रासाठी, मुलुंड (पूर्व) येथील १ भूखंड शॉपिंगसाठी, कन्नमवारनगर-विक्रोळी येथील १ भूखंड बहुउद्देशीय
समुदाय केंद्रासाठी, टागोरनगर-विक्रोळी येथील १ भूखंड निवासी वापर व १ भूखंड प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी,
गोराई व आकुर्ली येथील प्रत्येकी २ सुविधा भूखंड म्हणून आरक्षित
असून, या सुविधांकरिता हे भूखंड ई-निविदा मागवून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
निविदा कागदपत्रे १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० पासून डाउनलोड करता येतील.
बोलीपूर्व बैठक २ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता आहे.
१६ जानेवारी रोजी दुपारी ३:३० पर्यंत निविदा कागदपत्रे डाउनलोड करण्याची शेवटची तारीख आहे.
१६ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० पर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
२० जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता तांत्रिक बोली उघडण्यात येणार आहे.
आर्थिक बोली उघडण्याची तारीख यशस्वी बोलीधारकास स्वतंत्र कळविण्यात येणार आहे.