गोकुळधाम येथील शाळेचे मैदान नागरिकांसाठी खुले होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST2021-02-05T04:34:54+5:302021-02-05T04:34:54+5:30

मुंबई : गोरेगाव पूर्व गोकुळधाम येथील शाळेचे मैदान नागरिकांसाठी लवकर खुले होणार आहे. प्रभाग क्रमांक ५२ मधील विकास ...

The school ground at Gokuldham will be open to the public | गोकुळधाम येथील शाळेचे मैदान नागरिकांसाठी खुले होणार

गोकुळधाम येथील शाळेचे मैदान नागरिकांसाठी खुले होणार

मुंबई : गोरेगाव पूर्व गोकुळधाम येथील शाळेचे मैदान नागरिकांसाठी लवकर खुले होणार आहे.

प्रभाग क्रमांक ५२ मधील विकास आखाड्यात राखीव असलेली शाळेशी संलग्न असलेली तसेच अन्य मैदाने नागरिकांसाठी खुली करावीत यासाठी स्थानिक भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी गेली दोन वर्ष महापालिका प्रशासनासोबत पाठपुरावा केला होता.

या विषयांवर नुकतीच प्रभागामधील रहिवाशी संकुलाचे प्रतिनिधींना सोबत महापालिका उपायुक्त (उद्यान विभाग) रमाकांत बिरादार, पी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मैदान तातडीने सामान्य नागरिकांसाठी खुली करण्याची मागणी केली, अशी माहिती नगरसेविका सातम यांनी दिली.

सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक आयुक्त धोंडे यांनी यशोधाम, लक्षधाम, गोकुळधाम ही मैदाने शालेय वेळेव्यतिरिक्त जनतेसाठी खुली करण्याचे निर्देश दिले असून, लवकरच मैदान जनतेसाठी खुले होईल, असा आशावाद सातम यांनी व्यक्त केला.

---------------------------------------------

Web Title: The school ground at Gokuldham will be open to the public