SBIचा नवा निर्णय; एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 09:47 IST2025-04-11T09:47:37+5:302025-04-11T09:47:59+5:30

ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ओलांडली तर प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी २३ रुपये मोजावे लागतील.

SBIs new decision Change in ATM withdrawal rules | SBIचा नवा निर्णय; एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

SBIचा नवा निर्णय; एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सरकारी बँकएसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केला आहे. तुमच्या बचत खात्यात पैसे नसल्यामुळे एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास, २० रुपयांचा दंड व जीएसटी भरावा लागेल. 

ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ओलांडली तर प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी २३ रुपये मोजावे लागतील. ज्यांच्या बँक खात्यात १ लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक शिल्लक आहे त्यांना एसबीआय आणि इतर बँकेच्या एटीएममधून अमर्यादित व्यवहार करता येणार आहे. याचा अर्थ एटीएममधून प्रत्येक वेळी पैसे काढल्यावर त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Web Title: SBIs new decision Change in ATM withdrawal rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.