लोकलमधून पडणाऱ्या महिलांचा जीव वाचविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:23 IST2018-12-07T05:23:38+5:302018-12-07T05:23:51+5:30
दादर रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरताना तोल गेल्याने दोन महिला फलाटावर पडल्या.

लोकलमधून पडणाऱ्या महिलांचा जीव वाचविला
मुंबई : दादर रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरताना तोल गेल्याने दोन महिला फलाटावर पडल्या. मात्र, प्रवासी व लोहमार्ग पोलिसांच्या प्रसंगावधानाने दोघींचा जीव वाचला आहे. गाडी वेगात सुरु झाल्याने गाडीखाली खेचले जाण्याचा धोका होता. मात्र त्या महिलांना बाजूला करण्यात उपस्थितांना यश आल्याने त्यांचा जीव वाचला आहे. बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्हीत हा प्रसंग चित्रित झाल्याने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रवाशांनी जीव धोक्यात येईल, अशी कोणतीही कृती करु नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.