Sara Tendulkar ने मुंबई पोलिसांना टॅग करून समोर आणले गंभीर प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 17:43 IST2024-03-20T17:41:07+5:302024-03-20T17:43:24+5:30
सोशल मीडियावर नेहमी ग्लॅमरस फोटो टाकणाऱ्या सारा तेंडुलकरच्या ( Sara Tendulkar) आजच्या इंस्टा स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधले आहेत.

Sara Tendulkar ने मुंबई पोलिसांना टॅग करून समोर आणले गंभीर प्रकरण
सोशल मीडियावर नेहमी ग्लॅमरस फोटो टाकणाऱ्या सारा तेंडुलकरच्या ( Sara Tendulkar) आजच्या इंस्टा स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधले आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा हिने एका गंभीर प्रकरणावर मुंबई पोलिसांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सुधिर कुडाळकर यांच्या इंस्टा पोस्टचा फोटो साराने तिच्या इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. त्यात जयेश रामलाल देसाई या इसमाचा फोटो दिसत आहे आणि त्याच्यावर एका श्वानाची हत्या करण्याचा आरोप आहे. साराने ही पोस्ट करून मुंबई पोलिसांना टॅग केले आहे.
१२ ऑक्टोबर १९९७ सालचा साराचा जन्म... साराने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर बायोमेडिकल सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स केले आहे.
सुधिर कुडाळकर यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, Renwal Eleganta येथे या इसमाने एका श्वानाची हत्या केली. याच्याविरोधात FIR दाखल झाले आहे, परंतु आपल्याकडे प्राण्यांप्रती असलेले कायदे एवढे कमकुवत आहेत आणि जामीनपात्र आहेत, त्यामुळे त्याला जामीन मिळालेला आहे.