मुंबई - संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या आज दुपारी अचानक ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहे. पीएमसी बँकेतील ठेवींबाबत चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानंतर चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी वर्षा राऊत यांनी केली होती. तेव्हा ईडीने वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना दिली होती. दरम्यान, वर्षा राऊत या एक दिवस आधीच ईडीसमोरच चौकशीसाठी उपस्थित राहिल्या आहेत.पीएमसी बँकेत वर्षा राऊत यांच्या खात्यात १२ वर्षांपूर्वी निकटवर्तीय प्रकाश राऊत यांच्याकडून ५० लाख रुपये भरण्यात आले होते. याबाबत प्रकाश राऊत व त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आला असून ईडी गेल्या दीड महिन्यापासून वर्षा राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार करून विचारणा करीत आहे. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना २९ डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र संजय राऊत यांनी भाजपकडून ही राजकीय सुडातून कारवाई सुरू असल्याची टीका केली. मंगळवारी त्यांच्या पत्नी वर्षा या ईडीच्या कार्यालयाकडे गेल्या नव्हत्या.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल, चौकशीसाठी एक दिवस आधीच लावली उपस्थिती
By बाळकृष्ण परब | Updated: January 4, 2021 15:36 IST
Varsha Raut In ED Office Update : ईडीने वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना दिली होती. दरम्यान, वर्षा राऊत या एक दिवस आधीच ईडीसमोरच चौकशीसाठी उपस्थित राहिल्या आहेत.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल, चौकशीसाठी एक दिवस आधीच लावली उपस्थिती
ठळक मुद्देपीएमसी बँकेतील ठेवींबाबत चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले होतेत्यानंतर चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी वर्षा राऊत यांनी केली होतीतेव्हा ईडीने वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना दिली होती