Join us  

Sanjay Raut: शिवसेनेचे १४ खासदार फुटणार का? संजय राऊत म्हणाले, ते कुठेही गेले तरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 11:15 AM

शिवसेनेच्या १९ पैकी १४ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावं अशी भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई-

शिवसेनेच्या १९ पैकी १४ खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावं अशी भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली असल्याची माहिती समोर आली आहे. खासदारांनी आपली भूमिका व्यक्त केल्यानंतरही पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे नेतेपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १४ खासदार आता वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सूचक विधान केलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणणं अजूनही कठीण जातंय; संजय राऊत यांचा खोचक टोला

"खासदार फुटण्याच्या मार्गावर आहेत असं बोलणं चुकीचं आहे. काल आमच्या पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. पण मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कारण त्याचवेळी मला भाजपाच्या एका शाखेनं बोलावलं होतं. बैठकीबाबत माझं पक्षप्रमुखांशी बोलणं झालं आहे. खासदारांच्या भावना काय आहेत त्यावर पक्ष प्रमुखांनी चर्चा केली. चर्चा होऊ शकते. खासदार गेले किंवा जातात असं होत नाही. शिवसेनेत आमदार आणि खासदार निवडून आणण्याची पूर्ण ताकद आहे. शेवटी खासदार कुठेही गेले तरी खालची कार्यकर्त्यांची फळी तयार असते. मतदार देखील पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूने आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं", असं संजय राऊत म्हणाले. 

मी शिवसेना सोडली नसती- राऊत"माझ्यावर कितीही दबाव आणला गेला असता तरी मी शिवसेना सोडली नसती. मलाही पाडण्याचे प्रयत्न झाले. मी निवडणूक हरलो असतो तरी पक्ष सोडला नसता. मी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. काही झालं तरी गुवाहाटीला जाणाऱ्यातला मी नाही", असंही संजय राऊत म्हणाले.   

एकनाथ शिंदेंशी जुळवून घेण्याची शिवसेना खासदारांची मागणी, पण ठाकरेंकडून केराची टोपली; १२ खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत?

राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. फडणवीस राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाल्याबाबत मुंबई, ठाण्यात भाजपाकडून त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी भाजपाचा हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही असं म्हटलं. तसंच फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला मला अजूनही कठीण जातंय असा खोचक टोला राऊत यांनी यावेळी लगावला. 

"फडणवीसांना खरंतर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री असं म्हणणं सोपं आहे. पण मला त्यांना अजूनही उपमुख्यमंत्री म्हणणं कठीण जात आहे. पक्षाचा आदेश पाळण्याची संघाची परंपरा आहे. त्यामुळे फडणवीसांनी आदेशाचं पालन केलं त्याबाबत त्यांचं कौतुक करायला हवं", असं संजय राऊत म्हणाले. 

शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत"शिवसेना सोडून कुणी शिवसैनिक होऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. जिथं ठाकरे तिथं शिवसेना. तुम्ही वेगळी चूल मांडली असली तरी मूळ शिवसेना ठाकरेंपासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला होता. मी हरलो असतो तरी शिवसेना सोडून गेलो नसतो. मी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदेंवर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना नेतेपदावरुन काढण्याचा निर्णय शिष्टमंडळानं घेतला आहे", असं राऊत म्हणाले. 

कर नाही त्याला डर कशाला?- राऊत"ईडीच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. यापुढेही देईन. कारण सत्य तुमच्यासोबत असताना तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही", असं संजय राऊत म्हणाले. तसंच काल शिवसेना खासदारांची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीला मी उपस्थित राहू शकलो नाही. कारण भाजपाच्या एका शाखेनं मला बोलावलं होतं, असा टोला संजय राऊत यांनी ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर लगावला.  

फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणणं जड जातंय"फडणवीसांना खरंतर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री असं म्हणणं सोपं आहे. पण मला त्यांना अजूनही उपमुख्यमंत्री म्हणणं कठीण जात आहे. पक्षाचा आदेश पाळण्याची संघाची परंपरा आहे. त्यामुळे फडणवीसांनी आदेशाचं पालन केलं त्याबाबत त्यांचं कौतुक करायला हवं", असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाएकनाथ शिंदे