Join us  

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणणं अजूनही कठीण जातंय; संजय राऊत यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 10:53 AM

राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. फडणवीस राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाल्याबाबत मुंबई, ठाण्यात भाजपाकडून त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

मुंबई-

राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. फडणवीस राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाल्याबाबत मुंबई, ठाण्यात भाजपाकडून त्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी भाजपाचा हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही असं म्हटलं. तसंच फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणायला मला अजूनही कठीण जातंय असा खोचक टोला राऊत यांनी यावेळी लगावला. 

"फडणवीसांना खरंतर माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री असं म्हणणं सोपं आहे. पण मला त्यांना अजूनही उपमुख्यमंत्री म्हणणं कठीण जात आहे. पक्षाचा आदेश पाळण्याची संघाची परंपरा आहे. त्यामुळे फडणवीसांनी आदेशाचं पालन केलं त्याबाबत त्यांचं कौतुक करायला हवं", असं संजय राऊत म्हणाले. 

शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत"शिवसेना सोडून कुणी शिवसैनिक होऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. जिथं ठाकरे तिथं शिवसेना. तुम्ही वेगळी चूल मांडली असली तरी मूळ शिवसेना ठाकरेंपासून कुणी हिरावून घेऊ शकत नाही. मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला होता. मी हरलो असतो तरी शिवसेना सोडून गेलो नसतो. मी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदेंवर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना नेतेपदावरुन काढण्याचा निर्णय शिष्टमंडळानं घेतला आहे", असं राऊत म्हणाले. 

कर नाही त्याला डर कशाला?- राऊत"ईडीच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. यापुढेही देईन. कारण सत्य तुमच्यासोबत असताना तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही", असं संजय राऊत म्हणाले. तसंच काल शिवसेना खासदारांची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीला मी उपस्थित राहू शकलो नाही. कारण भाजपाच्या एका शाखेनं मला बोलावलं होतं, असा टोला संजय राऊत यांनी ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर लगावला.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस