Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Shirsat: संजय राऊत वेडसर माणूस, इंजेक्शन द्यावं लागेल; संजय शिरसाट यांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 13:21 IST

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा व्यवहार २ हजार कोटी रुपयांमध्ये झाला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई-

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा व्यवहार २ हजार कोटी रुपयांमध्ये झाला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जहरी टीका केली आहे. संजय राऊत वेडसर माणूस आहे आणि सायको माणसाच्या विधानाला किती महत्व द्यायचं?, असं संजय शिरसाट म्हणाले. तसंच संजय राऊत यांची तुलना शिरसाट यांनी पिसाळलेल्या कुत्र्याशी केली. 

शिवसेना नाव अन् धनुष्यबाण चिन्हासाठी लढाई; उद्धव ठाकरे गटाला तूर्तास दिलासा नाही, सरन्यायाधीश म्हणाले..

पिसाळलेल्या कुत्र्याला इंजेक्शन द्यावं लागतं तेव्हा ते शांत होतं. आता योग्य वेळ आली आम्ही इंजेक्शन देऊ, असही शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांनी शिंदे गट चोर असल्याचं विधान केलं होतं आणि २ हजार कोटींचा व्यवहार करुन शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह विकत घेतल्याचा खळबळजनक दावा केला होता. यावर संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त करत राऊतांवर जहरी टीका केली. 

विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटानं घेतलं ताब्यात; आता ठाकरेंच्या आमदारांचं काय?

"संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. सायको माणसाच्या विधानांना किती महत्व द्यायचं? आम्ही त्यांना आता महत्वचं देत नाही. शेवटी पिसाळलेल्या कुत्र्याला इंजेक्शन देऊन शांत केलं जातं. योग्य वेळ आली की इंजेक्शन दिलं जाईल. सध्या संजय राऊत यांनी आमदारांना बजावण्यात येणाऱ्या व्हिपबाबत काळजी घ्यावी. पक्षाकडून बजावण्यात येणारा व्हिप जर पाळला गेला नाही तर आमदारांवर निलंबनाची कारवाई होईल", असं संजय शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :संजय शिरसाटसंजय राऊत