संजय राऊतांचा भाजपाच्या किरीट सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 12:29 IST2023-06-13T12:27:11+5:302023-06-13T12:29:41+5:30

याप्रकरणी राऊत यांच्यावर आरोपही निश्चित करण्यात आले आहेत.

Sanjay Raut files defamation claim against BJP Leader Kirit Somaiya | संजय राऊतांचा भाजपाच्या किरीट सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

संजय राऊतांचा भाजपाच्या किरीट सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे. सोमय्या आपल्यावर निराधार आरोप करून समाजातील आपली प्रतिष्ठा धुळीस मिळवीत आहेत, असा दावा राऊत यांनी केला आहे.

या आधी सार्वजनिक शौचालय बांधकाम प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी राऊत यांच्यावर आरोपही निश्चित करण्यात आले आहेत.

राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार, सोमय्या त्यांच्या ट्विटरवरून २०२२ पासून  राऊत यांच्यावर निराधार आरोप करत आहेत. कोणतेही पुरावे नसताना कोविड सेंटर घोटाळ्याशी राऊत यांचा संबंध त्यांनी जोडला. मात्र, सोमय्या आपल्याला नाहक बदनाम करत आहेत आणि आपली समाजातील प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत.

Web Title: Sanjay Raut files defamation claim against BJP Leader Kirit Somaiya