Sanjay Raut News: के. ई. एम.मधील राजा एडवर्ड हे नाव गुलामगिरीचे प्रतीक आहे. त्यामुळे हे नाव बदलावे, अशी सूचना मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगल प्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला.
मंगलप्रभात लोढा यांना या संस्थेचा इतिहास नीट माहिती नसावा. मुंबईत फक्त पाच वैद्यकीय महाविद्यालये मुंबई पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्यातील चारची स्थापना १९५० पूर्वी झाली. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षाच्या काळात आपण केवळ एका मेडिकल कॉलेजची भर घालू शकलो आहे. मंगलप्रभात लोढा यांनी याचा विचार करायला हवा. मंगलप्रभात लोढा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. मुंबईत त्यांच्या प्रकल्पांची नावे लोढा बेलमोंडो, लोढा बेलाजिओ, अल्टामाऊंट, कासा बेला, ट्रम्प टॉवर अशी आहेत. मग ही नावे कुठल्या मातीतील आहेत. त्याऐवजी तुम्ही राम कुटीर, सीता सदन, लक्ष्मी निवास अशी आपल्या मातीमधील नावे का नाही ठेवली, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी करत टीका केली.
लोढांनी मुंबईत डोनाल्ड ट्रम्प टॉवरमधील ट्रम्प शब्द हटवावा
संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट करत केईएम प्रकरणी भाष्य केले आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम हॉस्पिटलच्या नावातील किंग एडवर्ड हा शब्द हटवण्याची मागणी केली. तो शब्द त्यांना ब्रिटिशांचं प्रतिक वाटतो. मात्र मुंबईत हेच लोढा अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ट्रम्प टॉवर बांधतात. लोढांनीही ट्रम्प शब्द हटवावा, असे संजय राऊत यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयाच्या १०० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, एडवर्ड नाव कायम ठेवण्याची काय गरज आहे? भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाला १०० वर्षांपेक्षा जास्त काळ गुलाम बनवले, त्यांची पूजा करण्याची गरज नाही. गुलामीचे प्रतीक असलेली नावे काढून स्वाभिमान दाखवणारी नावे देशात जिथे गरज आहे तिथे केली जात आहेत. येथेही महापालिका योग्य निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
Web Summary : Sanjay Raut criticizes Minister Lodha's call to rename KEM Hospital, pointing out Lodha's Trump Tower project in Mumbai. Raut suggests Lodha should remove the 'Trump' name first, questioning the selective aversion to foreign names.
Web Summary : संजय राउत ने मंत्री लोढ़ा द्वारा केईएम अस्पताल का नाम बदलने के आह्वान की आलोचना की और मुंबई में लोढ़ा की ट्रम्प टॉवर परियोजना की ओर इशारा किया। राउत का सुझाव है कि लोढ़ा को पहले 'ट्रम्प' नाम हटाना चाहिए, विदेशी नामों के प्रति चयनात्मक विरोध पर सवाल उठाना चाहिए।