Sameer Sharma suicide case Dont give private information to media for investigation | समीर शर्मा आत्महत्या प्रकरण: "प्रसारमाध्यमांना तपासातील खासगी माहिती देऊ नका"

समीर शर्मा आत्महत्या प्रकरण: "प्रसारमाध्यमांना तपासातील खासगी माहिती देऊ नका"

मुंबई : मालाडच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेले अभिनेते समीर शर्मा (४४) यांची ‘मीडिया ट्रायल’ होऊ नये. तपासात उघड झालेली खासगी माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नका, अशी विनंती त्यांच्या नातेवाइकांनी मालाड पोलिसांना केली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) याला बायपोलरसारख्या मानसिक आजाराने ग्रासल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याचे सांगत शर्मा यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. ते मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, सुशांत प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या गोंधळामुळे शर्मा यांचे कुटुंबीय धास्तावले आहे. त्यामुळेच शर्मा यांच्या मृत्यू प्रकरणातील तपासात उघड झालेली कोणतीही खासगी माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नका, अशी विनंती त्यांनी केल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सिद्धार्थ रुग्णालयाचे एक पथक शर्मा यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधत असून त्यांची बहीण, भावोजी तसेच काही मित्रांचे जबाब पोलीस नोंदवत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sameer Sharma suicide case Dont give private information to media for investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.