“मी सगळे व्हिडीओ काढून टाकले, लोकांना हसवणं...”; शोच्या वादावर समय रैनाने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 21:01 IST2025-02-12T21:01:12+5:302025-02-12T21:01:21+5:30

'इंडियाज गॉट लेटेंट'मधील अश्लील विधानामुळे सुरु झालेल्या वादावर समय रैनाने मौन सोडलं आहे.

Samay Raina broke his silence on the controversy surrounding the Indias Got Latent show | “मी सगळे व्हिडीओ काढून टाकले, लोकांना हसवणं...”; शोच्या वादावर समय रैनाने सोडलं मौन

“मी सगळे व्हिडीओ काढून टाकले, लोकांना हसवणं...”; शोच्या वादावर समय रैनाने सोडलं मौन

Samay Raina: कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने आई वडिलांविषयी केलेल्या अश्लील विधानामुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. समय रैनासह या शोमधली सर्वच कलाकारांवर कारवाई करण्याची मागणी राजकारण्यांपासून नेटकऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून समय रैनासह अनेकांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. या सगळ्या वादावर समय रैनाने मौन सोडलं आहे. इन्स्टा पोस्टमधून समय रैनानं आपलं म्हणणं मांडलं आहे.

कॉमेडियन समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने आई वडिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शोमधील सर्वच कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या वादावर समय रैनाने भाष्य करत इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ त्याच्या चॅनलवरून काढून टाकल्याचे म्हटलं आहे.

"हे सर्व घडत आहे ते हाताळणे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे. मी माझ्या चॅनलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे आणि त्यांचा चांगला वेळ जावा हेच माझे ध्येय होते. मी तपास यंत्रणांना सहकार्य करेन जेणेकरून त्यांचा तपास निष्पक्षपणे होईल. धन्यवाद," असं समय रैनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, इंडियाज गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला पालकांबद्दल अश्लील प्रश्न विचारला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच रणवीर आणि समय रैनावर टीका सुरू झाली. या दोघांविरुद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या एपिसोडमध्ये रणवीर अलाहाबादिया, आशिष चंचलानी, अपूर्वा मखिजा आणि जसप्रीत सिंग हे देखील आले होते. यापैकी आशिष चंचलानी आणि अपूर्वा मखिजा यांनी खार पोलिसांकडे जबाब नोंदवले आहेत. 

Web Title: Samay Raina broke his silence on the controversy surrounding the Indias Got Latent show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.