Join us

एका दिवसात झाली ६३ हजार मोबाइल तिकिटांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 06:13 IST

मध्य रेल्वे झोनमध्ये शुक्रवारी ६३ हजार ३१३ मोबाइल तिकिटांची विक्री करण्यात आली.

मुंबई : मध्य रेल्वे झोनमध्ये शुक्रवारी ६३ हजार ३१३ मोबाइल तिकिटांची विक्री करण्यात आली. मध्य रेल्वेच्या सर्व विभागांपैकी मुंबई विभागात तब्बल ६१ हजार १९६ मोबाइल तिकिटांची एका दिवसात सर्वोच्च विक्री झाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.मोबाइल तिकिटांमुळे प्रवाशांची तिकीट खिडक्यांवरील रांगांपासून सुटका झाली आहे. शिवाय मोबाइलद्वारे तिकीट काढता येत असल्याने त्यांच्या वेळेची बचत होत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.मध्य रेल्वे झोनमधील पुणे विभागात १ हजार २६३ मोबाइल तिकीट, भुसावळमध्ये ४९२, नागपूरमध्ये २५२ तर सोलापूर विभागात १४७ मोबाइल तिकिटांची विक्री एका दिवसात करण्यात आली.>मध्य रेल्वेच्या सर्व विभागांपैकी मुंबई विभागात तब्बल ६१ हजार १९६ मोबाइल तिकिटांची एका दिवसात सर्वोच्च विक्री>विभाग प्रवाशांची संख्या कमाईमुंबई ३ लाख ३० हजार ६३९ २९ लाख ४ हजार ५९७भुसावळ २ हजार १२९ ४४ हजार २६५नागपूर ९३३ २५ हजार ६००पुणे ३ हजार ४९९ ५७ हजार ९६सोलापूर ९६४ १३ हजार ८७०

टॅग्स :रेल्वे प्रवासीरेल्वे