सैफ अली खान हल्ला प्रकरण : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हा आरोपी जे सीमकार्ड वापरत होता, ते एका महिलेच्या नावावर असल्याचे तपासातून समोर आले. पोलिसांनी अधिकचा तपास केल्यानंतर ही महिला आरोपीला ओळखत असल्याचा आरोप आहे. पण, तिने चौकशीत वेगळीच माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई पोलिसांनी सैफ अली खान हल्ला प्रकरणात एका महिलेची चौकशी केली. या महिलेवर बांगलादेशातून आलेल्या आणि सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटेकत असलेल्या आरोपीला मोबाईल आणि सीमकार्ड दिल्याचा आरोप आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खुकूमोनी शेख असे या महिलेचे नाव आहे. ती पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील छपरा येथील रहिवाशी आहे. ही महिला बांगलादेशी घुसखोर शरीफुल इस्लाम याला ओळखते.
महिलेने चौकशीत काय सांगितले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भारतात राहत असताना या सीमकार्डचा वापर केला. हे सीमकार्ड महिलेच्या नावावर असल्याचे तपासातून समोर आले. महिलेची जेव्हा चौकशी करण्यात आली, तेव्हा तिने सांगितले की, तिचा मोबाईल चोरीला गेला होता.
मेघालायतून भारतात घुसखोरी
आरोपी सात महिन्यांपूर्वी मेघालयातील दवाकी नदीमार्गे भारतात आला होती. ही नदी भारत-बांगलादेश सीमेलगत आहे. त्यानंतर तो काही आठवडे पश्चिम बंगालमध्ये राहिला. त्याने तिथेच त्याचे नाव बदलून बिजॉय दास असे ठेवले होते. पश्चिम बंगालमध्ये राहिल्यानंतर तो कामाच्या शोधात मुंबईत आला होता. मुंबईला येण्यापूर्वी इस्लामने स्थानिक महिलेचे आधार कार्ड वापरून सीमकार्ड खरेदी केले होते.