हृदयात आसू, मात्र चेहऱ्यावर हासू; स्माइल डिप्रेशनचे कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:28 IST2025-07-05T12:27:55+5:302025-07-05T12:28:15+5:30
‘स्माइलिंग डिप्रेशन’मध्ये व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते; पण ती बाहेरून अगदी सामान्य किंवा आनंदी वाटते. ‘स्माइलिंग डिप्रेशन’ हा एक प्रकारचा हाय-फंक्शनिंग डिप्रेशन आहे. त्यात व्यक्ती ऑफिस, घर, समाजात आपले सर्व काम नीट पार पाडत असते.

हृदयात आसू, मात्र चेहऱ्यावर हासू; स्माइल डिप्रेशनचे कारण काय?
मुंबई : आजच्या धावपळीच्या युगात अनेक लोक सतत हसतमुख दिसतात. सोशल मीडियावर आनंदी फोटो शेअर करतात; पण अंतर्मनात खोल दुःख घेऊन वावरतात. यालाच मानसशास्त्रात ‘स्माइलिंग डिप्रेशन’ असे म्हटले जाते.
‘स्माइलिंग डिप्रेशन’मध्ये व्यक्ती डिप्रेशनमध्ये असते; पण ती बाहेरून अगदी सामान्य किंवा आनंदी वाटते. ‘स्माइलिंग डिप्रेशन’ हा एक प्रकारचा हाय-फंक्शनिंग डिप्रेशन आहे. त्यात व्यक्ती ऑफिस, घर, समाजात आपले सर्व काम नीट पार पाडत असते.
पाकिस्तानचा प्रस्ताव भारताने फेटाळला; ठणकावले, प्रथम दहशतवादावर बोला
ती हसते, बोलते, इतरांना मदतही करते, मात्र आतून तिच्यात निराशा, एकटेपणा आणि उदास असते. अशा व्यक्ती आपल्या मनातील बोलून दाखवत नाहीत.
ते मनातील बोलण्यास संकोचतात. त्यामुळे त्यांना योग्यवेळी मदतही मिळत नाही. यासाठी त्यांच्यासोबत बोलणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दुःख सांगण्यास संकोच
‘स्माइल डिप्रेशन’ने त्रस्त असलेले लोक दुःख, मानसिक ताण इतरांपासून लपवतात किंवा ते व्यक्त करण्यास संकोच करतात. त्यामुळे मदत मिळत नाही.
अनेकदा मनःस्थितीत चढ-उतार निर्माण होतात. अंतर्मनातील वेदना लपविल्यामुळे मदत मागणे किंवा त्यांच्या समस्या ओळखणे कठीण होते.
आरोग्यावर गंभीर परिणाम
‘स्माइल डिप्रेशन’मुळे मानसिक ताणच नाही तर उच्च रक्तदाब, निद्रानाश आणि हृदयविकाराची समस्या निर्माण होऊ शकते.
ठळक लक्षणे अशी...
आनंदी दिसण्याचा देखावा करताना यात व्यक्ती नेहमी हसताना, उत्साही किंवा आनंदी असल्याचा आव आणते. नैराश्याची अंतर्गत भावना या लक्षणामध्ये व्यक्तीला आतून एकटेपणा किंवा दुःख जाणवते.
कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होते; पण तेथेही एकटेपणा जाणवतो. काही वेळेला झोप किंवा भूक लागत नाही. व्यक्तीला कामावर किंवा दैनंदिन कामांमध्ये लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते.
खुलेपणाने संवाद साधा
आपल्याजवळच्या लोकांच्या हास्याआड दडलेले दुःख ओळखण्याचा प्रयत्न करा. मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने बोला. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती नैराश्यात, दुःखात असेल तर त्याच्याशी संवाद साधून नेमके काय झाले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.