Join us  

शहीदांचा अपमान करणाऱ्या साध्वींना तिकीट का दिलं? - राज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 8:58 PM

शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तिकीट का दिलं? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला विचारला.

मुंबई - भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांच्या शापाने हेमंत करकरे गेले. अतिरेक्यांशी लढताना जे शहीद झाले, त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही? शहीदांचा अपमान करणाऱ्यांना तिकीट का दिलं? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला विचारला. मुंबईतील भांडुप मतदारसंघात राज ठाकरे यांनी सभा पार पडली.   

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हेमंत करकरे ज्या प्रकरणाचा तपास करत होते तो बॉम्बस्फोटाचा खटला होता आणि दहशतवादाला धर्म असूच शकत नाही आणि अशा माणसाबद्दल विधान करणाऱ्यांना तुम्ही तिकीट देता. हा सत्तेचा माज आहे अशी टीका राज यांनी केली तसेच जेव्हा ह्यावर टीका सुरु झाली तेव्हा भाजपने हात झटकत सांगितलं की हे विधान आम्हाला मान्य नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे साध्वी प्रज्ञा ह्यांच्या विधानाचं समर्थन करतात असंही राज यांनी सांगितले. 

यावेळी राज ठाकरे भाजपावर टीका करताना सांगितले की, सरकारच्या योजनांच्या जाहिरातींवर साडेचार हजार रुपये कोटी खर्च केले. लोकांना नोकऱ्या देत नाही, एकही नवीन उद्योग उभा करता आला नाही आणि निव्वळ जाहिरातींवर खर्च करून लोकांना फसवायचा प्रयत्न करता? असा सवाल राज यांनी केला. 

टॅग्स :लोकसभा निवडणूकमनसेराज ठाकरे