मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी फोनवरून गैरवर्तन केल्या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. कोलकाता येथील एका व्यक्तीने सारा तेंडुलकर हिला फोन करून तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार करण्यात आळी होती. त्यानंतर मुंबई आणि कोलकाता पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
सचिनच्या मुलीशी गैरवर्तन! कोलकाता येथून एक तरुण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 12:59 IST