‘सुपरकॉप’ होण्यासाठी वाझेने रचले कारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 08:32 AM2021-09-05T08:32:21+5:302021-09-05T08:32:46+5:30

एनआयएने आरोपपत्रात केला दावा

Sachin Waze plotted to become a 'supercop' | ‘सुपरकॉप’ होण्यासाठी वाझेने रचले कारस्थान

‘सुपरकॉप’ होण्यासाठी वाझेने रचले कारस्थान

googlenewsNext
ठळक मुद्देउद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटेलियाजवळ जिलेटिन असलेली कार पार्क करणे आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कारमायकल रोडवर कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या असलेली स्फोटके ठेवण्यामागे विविध चर्चा सुरू असल्या तरी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मात्र त्यासाठी बडतर्फ एपीआय सचिन वाझेला जबाबदार धरले आहे. ‘सुपरकॉप’ बनण्याच्या हेतूनेच त्याने हे कारस्थान घडवून आणल्याचा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटेलियाजवळ जिलेटिन असलेली कार पार्क करणे आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तब्बल १० हजार पानांच्या या चार्जसीटमध्ये वाझे, प्रदीप शर्मा, सुनील माने, रियाज काझी आदींसह १० जणांवर आरोप ठेवले आहेत. कार पार्किंगच्या कटात सहभागी असलेल्या मनसुखला त्यांनी ‘अंडरग्राउंड’ होण्यास सांगून हत्या केल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे.
ख्वाजा युनूस प्रकरणामुळे निलंबित असलेल्या वाझेला परमबीर सिंह यांनी जून २०२० ला मुंबई पोलीस दलात पुन्हा घेऊन ‘सीआययू’चे प्रमुख बनविले होते. आधी झालेल्या या निलंबनाच्या कारवाईमुळे सचिन वाझे व्यथित होता. पुन्हा सेवेत रुजू झाल्यानंतर त्याला मुंबई पोलीस दलात आपला पूर्वीप्रमाणे स्पेशल डिटेक्टिव्ह आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रभाव निर्माण करायचा होता. त्यासाठी मनसुखला कार चोरीची तक्रार देण्यास सांगून स्वतः ताब्यात घेतली. त्यामध्ये २० जिलेटिनच्या कांड्या, धमकीचे पत्र ठेवून अँटेलियाच्या परिसरात स्कॉर्पियो ठेवली होती, असे एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे.

मनसुखने दिलेला नकार
मनसुखने या घटनेची जबाबदारी घेण्यास नकार दिल्यानंतर सुनील माने आणि प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्याला संपविण्याचा कट रचला. त्याला काही दिवस अज्ञातवासात राहण्यास प्रवृत्त करून मानेने त्याला आपल्या सोबत घेऊन संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोठकुरी, मनीष सोनी यांच्याकडे सोपविले. त्यांनी हत्या करून त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकून दिला.

Web Title: Sachin Waze plotted to become a 'supercop'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.