Sachin Vaze: परमबीर यांनीच केली वाझेची नियुक्ती; नगराळे यांचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:33:10+5:302021-04-08T04:35:02+5:30
वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत ५ जून २०२० रोजी झालेल्या निलंबन आढावा बैठकीत घेण्यात आला.

Sachin Vaze: परमबीर यांनीच केली वाझेची नियुक्ती; नगराळे यांचा अहवाल
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच सचिन वाझेची नियुक्ती केल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहविभागाला सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट हाेत आहे. या नियुक्तीला तत्कालीन सहआयुक्तांचा (गुन्हे) विरोध असल्याचेही यात नमूद आहे.
वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत ५ जून २०२० रोजी झालेल्या निलंबन आढावा बैठकीत घेण्यात आला. त्यात वाझेची सशस्त्र दलात बदली करण्यात आली होती. ही नेमणूक अकार्यकारी हाेती. त्यानंतर ८ जूनच्या बैठकीत त्याची नियुक्ती गुन्हे शाखेत करण्यात आली, असे नगराळे यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
अहवालात मिळतील या प्रश्नांची उत्तरे...
वाझेला सीआययू प्रमुख पदावर नियुक्त करताना, सीआययूमधील कोणत्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना दुसरीकडे हलविण्यात आले व का?
सर्वसाधारण रिपोर्टिंगची पद्धत काय आहे? वाझे कोणाला रिपोर्टिंग करत होता?
वाझे कोणाच्या मार्गदर्शनाखाली काम करत होता?