लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके भरलेली कार उभी करताना आणि ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचताना निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून ते काम करत नव्हते. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी राज्य सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही, असे निरीक्षण नोंदवीत गुरुवारी उच्च न्यायालयाने वाझे याची मुक्ततेबाबतची याचिका न्या. सारंग कोतवाल आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळली.
आपल्याला अटक करताना सरकारची मंजुरी न घेतल्याने अटक बेकायदा आहे. त्यामुळे आपली सुटका करावी, अशी मागणी वाझेने आपल्या याचिकेत केली होती.