Sachin Vaze: NIAला हवंय 'या' महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर; मुंबईतल्या बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 16:15 IST2021-03-17T16:12:50+5:302021-03-17T16:15:23+5:30
Sachin Vaze: पुढील एक ते दोन दिवसांत एनआयए करणार मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी

Sachin Vaze: NIAला हवंय 'या' महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर; मुंबईतल्या बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सुरू आहे. या घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनाच एनआयनं अटक केली आहे. त्यामुळे वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानंतर आता मुंबई पोलीस दलातल्या अनेक बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
वाझे अडकले, पुरावे सापडले; आता 'ती' फाईल अमित शहांकडे, ठाकरे सरकारला आणखी एक धक्का?
एनआयएचे अधिकारी पुढील एक ते दोन दिवसांत मुंबई पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएला सहआयुक्त मिलिंद भारंबे, प्रकाश जाधव आणि आणखी काही अधिकाऱ्यांकडून माहिती हवी आहे. त्यासाठी लवकरच या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. या चौकशीतून एनआयएच्या तपासाला दिशा आणि गती मिळण्याची शक्यता आहे.
“सचिन वाझेंना ‘ती’ मर्सिडीज घेण्यासाठी नाना पटोले अन् सचिन सावंत यांनीच मदत केली”
अंबानी स्फोटक प्रकरणाचं गांभीर्य अतिशय जास्त आहे. मात्र असं असताना या प्रकरणाचा तपास सचिन वाझे यांच्यासारख्या सहायक पोलीस निरीक्षक (API) इतक्या कनिष्ठ पदावरील अधिकाऱ्याकडे का देण्यात आला. मुंबई पोलीस दलात सचिन वाझे यांच्यापेक्षा अनेक वरिष्ठ अधिकारी असताना हा तपास सचिन वाझेंकडे देण्याचं कारण काय, या प्रश्नांची उत्तरं एनआयएला हवी आहेत. त्यासाठीच मुंबई पोलीस दलातल्या बड्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.
सचिन वाझे अडकले, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या ‘त्या’व्यक्तीचा शोध लावण्यात NIA ला मोठं यश
वाझेंच्या दाव्यावर एनआयएला विश्वास नाही
सचिन वाझेंनी चौकशीदरम्यान अद्याप तरी मुंबई पोलीस दलातल्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव घेतलेले नाही. मात्र तशी वेळ आल्यास त्यासाठीही एनआयए सज्ज आहे. निलंबनाआधी आपली सुपरकॉप अशी ओळख होती. हीच ओळख परत मिळवण्यासाठी अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याचा दावा वाझेंनी चौकशीत केला. मात्र एनआयएचा त्यांच्या दाव्यावर विश्वास नाही.