Join us  

धान उत्पादकांना क्विंटलमागे ५०० रुपये अनुदान : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 4:12 AM

चालू वर्षी केंद्र सरकारने धानाची किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे.

मुंबई : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

चालू वर्षी केंद्र सरकारने धानाची किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकºयांना ५० क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल ५०० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना खरीप २०१९ मधील पीक विम्याच्या रकमेचे वाटप १२ डिसेंबर रोजी लाखांदूर येथे शेतकरी मेळावा घेऊन करावे, असे निर्देश विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे विमा कंपनीला दिले. पटोले यांनी या संदर्भात विधानभवनात बैठक घेतली.भंडारा जिल्ह्यातील १.६१ लाख धान उत्पादक शेतकºयांनी पीक विमा काढला. त्यांनी ५.४३ कोटी रुपये विम्याच्या हप्त्यापोटी जमा केले. आता या शेतकºयांना नुकसान भरपाईपोटी ६७.८६ कोटी रु. मिळणार आहेत. ही रक्कम प्रतिहेक्टरी ९ हजार ६२ रुपये असेल.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाशेतकरी