Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 05:58 IST

मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने भिसे यांचा प्रसूतिपश्चात मृत्यू झाल्याने जनसामान्यांत संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर चौकशीअंती या रुग्णालयाला दंडही ठोठावण्यात आला.

मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी उपचार नाकारल्यानंतर तनिषा भिसे या गर्भवती महिलेला सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान त्यांनी दोन बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे भिसे यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्या दोन बाळांचे वजन खूपच कमी असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. बाळांच्या उपचारासाठी येणारा २४ लाख रुपयांचा खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून देण्यात आला आहे. पुढेही उपचारासाठी लागणारा खर्च या निधीतून देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 

मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने भिसे यांचा प्रसूतिपश्चात मृत्यू झाल्याने जनसामान्यांत संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर चौकशीअंती या रुग्णालयाला दंडही ठोठावण्यात आला. त्यापैकी पाच लाख रुपयांच्या एफडी करण्यात येणार असून, भिसे यांच्या दोन मुली सज्ञान झाल्यावर व्याजासह त्यांना ही रक्कम दिली जाणार आहे, तसेच या बाळांच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे.

आतापर्यंतचे बिल असे...

सूर्या हॉस्पिटलने बाळांच्या उपचारांचे बिल मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे पाठवले होते. त्यात एका बाळावर १० लाख आणि दुसऱ्या बाळावर १४ लाख रुपयांचा खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे.

‘यापुढेही खर्चाची रक्कम देणार’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या बाळांच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधीमार्फत केला जात आहे.  आतापर्यंतच्या खर्चाचे बिल रुग्णालयाने पाठिवले असून, ते मंजूर झाले आहे. यानंतरही उपचारासाठी येणारा खर्च निधीमार्फत करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :पुणेहॉस्पिटल