..अन्यथा रिपाइं सर्व जागा लढवेल

By Admin | Updated: January 13, 2015 01:03 IST2015-01-13T01:03:57+5:302015-01-13T01:03:57+5:30

मित्र पक्षांबरोबर जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा न झाल्यास समविचारी घटकांना एकत्रित करून महापालिकेच्या सर्व जागा लढविल्या जातील

..that the RPI will fight all the seats | ..अन्यथा रिपाइं सर्व जागा लढवेल

..अन्यथा रिपाइं सर्व जागा लढवेल

नवी मुंबई : मित्र पक्षांबरोबर जागा वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा न झाल्यास समविचारी घटकांना एकत्रित करून महापालिकेच्या सर्व जागा लढविल्या जातील, अशी माहिती रिपाइंचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आठवले आज वाशी येथे आले होते. महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढाव्यात, अशी आमची भूमिका आहे. महायुती झाल्यास रिपाई १८ जागांची मागणी करेल. मात्र शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष स्वतंत्ररीत्या लढले तर भाजपाने आम्हाला ३0 जागा सोडाव्यात. दोन्ही पर्यायावर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर रिपाइं महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढवेल, असे आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: ..that the RPI will fight all the seats