Join us  

“विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही”; रोहित पवारांनी केले अजितदादांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 1:20 PM

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) अजित पवार यांचे कौतुक केले आहे.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या (Ajit Pawar) कामाचा धडाका सर्वश्रुत असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) अजित पवार यांचे कौतुक केले असून, विकासाचे व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझे भाग्यच आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासह काही कामांचा आढावा घेतला. 

अजित पवार बारामती दौऱ्यावर असून, तेथील कामांचा आढावा घेतला. यावेळी रोहित पवार सोबत होते. अजित पवारांसोबतचा अनुभव रोहित पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेअर केला आहे. यावेळी त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. 

विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही

भल्या सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अजितदादा पवार… गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता कायम आहे. विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही. आजही पहाटेच बारामतीत विविध कामांना भेट देऊन अजितदादांनी आढावा बैठक घेतली. विकास कामं करताना दादांचं त्यावर बारकाईने लक्ष असतं. आज मीही त्यांच्यासोबत उपस्थित होतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांसारख्या खऱ्या अर्थाने कार्यकुशल आणि विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, आयकर विभागाचे अधिकारी (पाहुणे) असा उल्लेख पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला त्रास (डिस्टर्ब) द्यायचा नाही. त्यांचा पाहुणचार झाल्यानंतर मी पुढे सगळे बोलणार आहे. ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशीच बोलणार आहे. मी येथेच आहे. कोठेही पळून जाणार नाही. तसेच मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. याबाबत मला कोणतीही नोटीस आलेली नाही, अशा खरपूस शब्दात आयकर विभागाकडून होत असलेल्या कारवाईबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला. आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री पवार यांचा मुलगा पार्थ तसेच नातेवाईकांच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत.  

टॅग्स :राजकारणअजित पवाररोहित पवार