विद्यार्थ्यांनी बनविले रोबोट, अलार्म आणि व्हॅक्यूम क्लिनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:34 AM2019-11-18T00:34:06+5:302019-11-18T00:34:09+5:30

बालविज्ञान संमेलनामुळे वैज्ञानिक गुणांना वाव

Robots, alarms and vacuum cleaners created by students | विद्यार्थ्यांनी बनविले रोबोट, अलार्म आणि व्हॅक्यूम क्लिनर

विद्यार्थ्यांनी बनविले रोबोट, अलार्म आणि व्हॅक्यूम क्लिनर

googlenewsNext

मुंबई : मराठी विज्ञान परिषद आणि होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मानखुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरातून आलेल्या १५० विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात मुलांचे तीन वेगवेगळे गट पाडून एका गटाला व्हॅक्यूम क्लीनर, दुसºया गटाला रोबोट व तिसºया गटाला अलार्म तयार करण्यास संगितले होते.

प्रत्येक विद्यार्थ्याला व्हॅक्यूम क्लीनर, अलार्म व रोबोट तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य देण्यात आले होते. ते बनवण्याची कृती समजावून सांगण्यात आली होती. त्याप्रमाणे विद्यार्थी सर्व साहित्याची जुळवाजुळव करू लागले. स्टेम लर्निंग या संस्थेचे प्रतिनिधी मुलांना या गोष्टी बनविण्याकरिता मार्गदर्शक म्हणून लाभले होते. व्हॅक्यूम क्लीनर व रोबोट तयार झाल्यानंतर परीक्षकांद्वारे ते तपासले जात होते. योग्य रीतीने बनल्यानंतर ती वस्तु मुलांना आपल्या घरी घेऊन जाण्यास मिळत होती. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक गुणांना वाव मिळवा व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास तयार व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

Web Title: Robots, alarms and vacuum cleaners created by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.