विद्यापीठात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:18 IST2025-03-22T15:17:57+5:302025-03-22T15:18:21+5:30

मुंबई विद्यापीठ आणि रोबोटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्यात याबाबत नुकताच सामंजस्य करार झाला आहे...

Robotics, Artificial Intelligence Center at the mumbai University | विद्यापीठात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र

विद्यापीठात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र

मुंबई : मुंबई विद्यापीठाने सेंटर फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स अँड एआयची (रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्ट केंद्र) स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक रोबोटिक प्रणालींसह प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा समावेश असलेला ‘एमटेक इन रोबोटिक्स’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम याच शैक्षणिक वर्षापासून सुरू केला जाणार आहे. 

मुंबई विद्यापीठ आणि रोबोटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्यात याबाबत नुकताच सामंजस्य करार झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील विस्तीर्ण केंद्रातील सुमारे ४५ हजार चौरस फुटावर हे सेंटर तयार केले जाणार आहे. हे केंद्र रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि औद्योगिक ऑटोमेशनमधील संशोधन, विकास आणि प्रशिक्षणासाठीचे केंद्र म्हणून काम करेल. उदयाेन्मुख आणि प्रगत क्षेत्रातील गरजा आणि औद्योगिक आव्हानांवर मात करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून सहयोगी संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल. 

कौशल्य वृद्धीसाठी प्रशिक्षण
रोबोटिक्स, ऑटोमेशनमधील कौशल्ये वृद्धीसाठी या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी, संशोधक, व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि जॅन्युटेक इंडस्ट्री यांच्या माध्यमातून  अभियंते आणि विद्यमान औद्योगिक कर्मचाऱ्यांच्या कौशल्यासाठी  प्रमाणित रोबोटिक्स प्रोग्रामिंग/ऑपरेटर प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. 

संशोधनाला दिशा, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता
रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगत शिक्षण आणि संशोधनाला नव्या केंद्राच्या माध्यमातून नवीन दिशा मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल. 
तसेच या केंद्राच्या स्थापनेमुळे आधुनिक रोबोटिक प्रणालींवर काम करण्याची क्षमता आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 
विद्यार्थी सक्षम होऊ शकतील, असे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Robotics, Artificial Intelligence Center at the mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.