Join us

भांडुपमध्ये चोरट्यांनी एका रात्रीत सहा दुकाने फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 11:38 IST

भांडुप पश्चिमेकडील भट्टीपाडा परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल सहा दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई - भांडुप पश्चिमेकडील भट्टीपाडा परिसरात गुरुवारी (4 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल सहा दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी  सहा दुकानांच्या भिंती आणि टाळे फोडून लाखोंच्या ऐवज लंपास केला आहे. 

चोरट्यांनी चोरीसाठी  गॅस सिलेंडर, कटरचा वापर केला आहे. चोरीसाठी वापरलेलं सामान तिथेच ठेवून त्यांनी पळ काढला. या घटनेमुळे भांडुपमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :दरोडामुंबईपोलिस