Join us
Daily Top 2Weekly Top 5

मानखुर्द रेल्वे स्थानकावर चोरट्याला पोलिसांनी पकडले रंगेहाथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 20:00 IST

रेल्वे पोलिसांची उत्तम कामगिरी 

मुंबई - मानखुर्द रेल्वे स्थानकावर चोर चोर... असा आवाज ऐकल्यानंतर तात्काळ मदतीसाठी धावलेल्या हेड कॉन्स्टेबल आर. के. मिश्रा आणि सुरक्षा रक्षक जावेद पाटील यांनी पळ काढणाऱ्या पाकिटमाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

कल्याण येथील नांदिवली परिसरात राहणाऱ्या देवेंद्र राजा रॅम कमरेकर (वय - २७) हा इसम गोवंडी ते मानखुर्द प्रवास कात असताना त्याचे एका अज्ञात चोरट्याने पाकिट मागच्या खिश्यातून लंपास केले. दरम्यान, देवेंद्रने चोर चोर... अशी मदतीसाठी हाक मारली. आवाज ऐकून रेल्वे पोलिसांनी ताबडतोब चोराचा पाठलाग करत त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीत एक विवो आणि एक सोनी कंपनीचा मोबाईल फोन, पाच हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. या चोराला वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून भा. दं. वि. कलम ३७९ अन्वये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :मुंबईरेल्वेदरोडाअटक