पावसामुळे रस्ते वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST2021-06-17T04:06:27+5:302021-06-17T04:06:27+5:30

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी ...

Road congestion due to rains | पावसामुळे रस्ते वाहतुकीचा खोळंबा

पावसामुळे रस्ते वाहतुकीचा खोळंबा

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी सकाळी जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर १२ मिनिटे, इस्टर्न एक्सप्रेस वे वर १५ मिनिटे आणि ईस्टर्न फ्री वे वर ८ मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती.

वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, शिव, माटुंगा, परळ आणि किंग सर्कल भागात पूर्ण पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती तर हिंदमाता भागातही पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

नेहमीच्या तुलनेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर संथगतीने वाहनांची वाहतूक सुरू होती. पूर्व उपनगरातही हीच परिस्थिती होती. पोलिसांनी सांगितले की, पावसामुळे नेहमीच्या तुलनेत वाहनांच्या संख्येत घट होते, पण रस्त्यात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होते.

Web Title: Road congestion due to rains