Join us

मुंबईतील खड्ड्यांवरुन मलिष्का 'झिंगाट'; नवं गाणं व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 15:22 IST

मलिष्काच्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई: मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का? असं म्हणत गेल्या वर्षी पालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मलिष्काचं खड्ड्यांवरचं गाणं सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. सैराट सिनेमातील झालं झिंग झिंगाट गाण्याच्या धर्तीवर मलिष्कानं 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' गाणं तयार केलं आहे. सध्या हे गाणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

अवघ्या काही तासांच्या पावसानं मुंबईची होणारी तुंबई, त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे होणारे हाल, यावर मलिष्कानं गाण्यातून भाष्य केलं आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या वर्षी मलिष्कानं उपहासात्मक गाण्यातून बीएमसीवर निशाणा साधला होता. त्या गाण्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं मलिष्कावर जोरदार टीका केली होती. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. त्यामुळे आता मलिष्काच्या खड्ड्यांबद्दलच्या गाण्याचे कसे पडसाद उमटणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :खड्डेमुंबईमुंबई महानगरपालिका