Join us  

मानलं तुम्हाला; रितेश देशमुख आणि जेनेलियाचा अवयवदानाचा संकल्प!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 1:48 PM

रितेश-जेनेलिया यांनी यंदाचा डॉक्टर दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देरितेश-जेनेलिया यांचं केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्याकडून कौतुकसोशल मीडियावर नेटकऱ्यांकडूनही रितेश-जेनेलियाच्या पुढाकाराला पाठिंबा

बॉलिवूड चित्रपटातील क्यूट जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी बुधवारी डॉक्टर दिनी मोठा निर्णय घेतला. जागतिक डॉक्टर दिनी सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. पण, रितेश-जेनेलिया यांनी यंदाचा डॉक्टर दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. रितेश-जेनेलिया यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून ही माहिती दिली.

रितेश-जेनेलिया यांनी म्हटले की,''जेनेलिया आणि मी याबाबत अनेकदा चर्चा केली. अनेकदा विचार केला. पण, दुर्दैवानं आतापर्यंत बोलू शकलो नव्हतो. पण, आज 1 जुलैला आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की, आम्ही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्याला आयुष्य देणं यापेक्षा मोठं गिफ्ट असूच शकत नाही. तुम्हालाही तसंच वाटत असेल, तर तुम्हीही पुढाकार घ्या आणि अवयव दान करा.''

पाहा व्हिडीओ..

रितेश-जेनेलिया यांच्या पुढाकाराचे केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी कौतुक केलं. त्यांनी लिहिलं की,''रितेश-जेनेलिया यांच्यासारखे युवा कलाकार पुढाकार घेऊन अवयव दान करण्याचा निर्णय घेत असल्याचे पाहून चांगलं वाटत आहे. त्यांच्या या पुढाकारानंतर अनेक जण सामाजिक जाण म्हणून पुढाकार घेतील.'' 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जेनेलिया त्याची हिरोईन होती. याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती.  पुढे चित्रपटाच्या सेटवर रितेशचा स्वभाव जेनेलियाला हळूहळू कळू लागला आणि दोघांत मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले, हेही दोघांना कळले नाही.

‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या चित्रपटात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 2012 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.

कोरोनामुक्त होताच शाहिद आफ्रिदी काश्मीर मुद्द्यावर बरळला; केलं मोठं विधान

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजामुंबईमहाराष्ट्रबॉलिवूड