rise in temperature mumbai records 37 degree Celsius | मुंबई तापली; पारा ३७ अंशांवर

मुंबई तापली; पारा ३७ अंशांवर

मुंबई : सकाळऐवजी दुपारी स्थिर होणाऱ्या वाºयामुळे मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत असून मुंबापुरीचा पारा दिवसागणिक वाढतच आहे. मुंबईचे कमाल तापमान मंगळवारी ३७.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, वाढते तापमान आणि तापदायक सूर्यकिरणांमुळे वातावरण मुंबईकरांना असह्य होऊ लागले आहे. बुधवारसह गुरुवारीही मुंबईतील आकाश निरभ्र राहील, कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

सर्वाधिक कमाल तापमान मुंबईत
१७ फेब्रुवारी रोजी मुंबईचे कमाल तापमान ३८.१ अंश नोंदविण्यात आले. हवामान खात्याच्या नोंदीनुसार या दिवशी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली होती. आजही म्हणजे २५ फेब्रुवारीलाही राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. २५ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३९.६ अंश होते. आतापर्यंतच्या तापमानांपैकी ते सर्वाधिक कमाल तापमान आहे. तर, १७ फेब्रुवारी २०२० ला मुंबईचे कमाल तापमान ३८.१ अंश होते. गेल्या दहा वर्षांतील ते सर्वाधिक तिसरे कमाल तापमान आहे.

Web Title: rise in temperature mumbai records 37 degree Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.