Join us
Daily Top 2Weekly Top 5

६० रुपयांत मुंबई फिरा, बेस्टची फायदेशीर योजना; एका तिकीटात संपूर्ण शहरात प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 06:06 IST

एकाच तिकिटात संपूर्ण मुंबईत प्रवाशांना फिरता यावे म्हणून बेस्टने ५० व ६० रुपयांची दैनिक पास योजना सुरू केली आहे.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी मुंबईत येतात. या अनुयायांना मुंबईत फिरता यावे यासाठी बेस्ट उपक्रमाने ५० व ६० रुपयांची दैनिक पास योजना आणली आहे. ‘चलो स्मार्ट कार्ड’ व्यतिरिक्त हे दैनिक पास प्रवाशांना ५ ते ७ डिसेंबर दरम्यान शिवाजी पार्क येथून खरेदी करता येणार आहेत.

मुंबईत ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी शिवाजी पार्क,चैत्यभूमी येथे दाखल होतात. या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बसमधून फिरता यावे यासाठी जादा बसेस ही सोडल्या जातात. एकाच तिकिटात संपूर्ण मुंबईत प्रवाशांना फिरता यावे म्हणून बेस्टने ५० व ६० रुपयांची दैनिक पास योजना सुरू केली आहे. अधिकाधिक प्रवाशांनी दैनिक पास खरेदी करावेत,असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

टॅग्स :बेस्ट