Rickshaw-taxi will start soon in Mumbai, first meeting of action force positive | मुंबईत रिक्षा-टॅक्सी लवकरच सुरू होणार, कृती दलाची पहिली बैठक सकारात्मक

मुंबईत रिक्षा-टॅक्सी लवकरच सुरू होणार, कृती दलाची पहिली बैठक सकारात्मक

मुंबई : मुंबईत लॉकडाऊनमुळे बंद असलेली रिक्षा, टॅक्सी लवकरच सुरू होणार आहे. वाहतूक कृती दलाच्या पहिल्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत लॉकडाऊनपासून रिक्षा-टॅक्सी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा, टॅक्सीला परवानगी आहे. तर रेड झोनमध्ये रिक्षा, टॅक्सीवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक चालकांनी रिक्षा, टॅक्सी बंद ठेवल्या आहेत. सरकारने वाहतूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी एका कृती दलाची स्थापना केली. त्याची शुक्रवारी पहिली बैठक झाली. या बैठकीला परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह वाहतूक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. या वेळी चालकांची बिकट आर्थिक स्थिती पाहता ही सेवा लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्याला परिवहनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याबाबतची घोषणा ३० जूनपर्यंत होईल, असे सूत्रांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rickshaw-taxi will start soon in Mumbai, first meeting of action force positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.