रिक्षाचालकाचा मुलगा ‘आरडी’ परेडमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 13:19 IST2023-01-26T13:19:01+5:302023-01-26T13:19:34+5:30
लष्करात अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या मुन्नाचे वडील रिक्षाचालक आहेत.

रिक्षाचालकाचा मुलगा ‘आरडी’ परेडमध्ये...
मुंबई :
प्रजासत्ताकदिनानिमित्त आज, गुरुवारी राजधानी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात येथील सिद्धार्थ कॉलेजचा विद्यार्थी मुन्ना आणि एनसीसीचा नेव्हल कॅडेट मुन्ना चौधरी ऑल इंडिया नेव्हल प्लॅटूनचे नेतृत्व करत आहे. लष्करात अधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या मुन्नाचे वडील रिक्षाचालक आहेत.
एकूण १४८ कॅडेट संचलनात १६ डायरेक्टरेटचे प्रतिनिधित्व करतात. एकूण ७ कॅम्पसमधून निवड झाल्यावरच आरडी रिटर्न होता येते. अनेक वर्षांनंतर ऑल इंडिया नेव्हल प्लॅटून कमांडर होण्याचा मान महाराष्ट्राला सिद्धार्थ डीटॅचमेंटच्या मुन्ना चौधरी यांनी मिळवून दिला.
१९९६ पासून सिध्दार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे कॅसेट्स राजपथवर वन महाराष्ट्र नेव्हल युनिटचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही परंपरा मुन्नाने पुढे चालविली. मुन्नाला लष्करात अधिकारी व्हायचे असून त्यासाठी तो जिद्दीने तयारी करत आहे. रिक्षा चालविणाऱ्या वडिलांचे प्रोत्साहन व उमेद पुढची दिशा ठरेल अशी मुन्नाला खात्री आहे.