Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालक उद्यापासून जाणार बेमुदत संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 15:43 IST

संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्दे९ जुलै रोजी होणाऱ्या संपाला काही संघटनांनी पाठिंबा दिला आहे. रिक्षा क्रांती संयुक्त कृती समिती आणि भाजप प्रणीत नवभारतीय शिववाहतूक संघटनेने या संपास विरोध केला आहे.

मुंबई - रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीसह ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करा आदी मागण्यांसाठी रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने ९ जुलै रोजी संपाची हाक दिली आहे. संपातमुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील रिक्षाचालक सहभागी होणार आहेत.९ जुलै रोजी होणाऱ्या संपाला काही संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामध्ये लालबावटा रिक्षा युनियन डोंबिवली, स्वाभिमान टॅक्सी संघटना यांचा समावेश आहे, तर रिक्षा क्रांती संयुक्त कृती समिती आणि भाजप प्रणीत नवभारतीय शिववाहतूक संघटनेने या संपास विरोध केला आहे.

टॅग्स :ऑटो रिक्षासंपमुंबईपुणेठाणेनवी मुंबई