‘तरबेज रिक्षाचालक’ निघाले ‘चोर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 05:59 IST2017-07-27T05:59:26+5:302017-07-27T05:59:29+5:30
मुलांना शाळेत सोडायला अथवा आणायला पालक गेले की त्या घराला ‘टार्गेट’ करायचे. त्याचा कडीकोयंडा उचकटून अवघ्या ‘तीन’ मिनिटांत आत प्रवेश करत पैसे आणि दागिने लंपास करून पसार व्हायचे.

‘तरबेज रिक्षाचालक’ निघाले ‘चोर’!
मुंबई : मुलांना शाळेत सोडायला अथवा आणायला पालक गेले की त्या घराला ‘टार्गेट’ करायचे. त्याचा कडीकोयंडा उचकटून अवघ्या ‘तीन’ मिनिटांत आत प्रवेश करत पैसे आणि दागिने लंपास करून पसार व्हायचे. या कार्यपद्धतीने चोरी करून उपनगरात धुमाकूळ घालणाºया एका रिक्षाचालक टोळीच्या मुसक्या आवळण्यात मंगळवारी विलेपार्ले पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले.
अय्यपा शेट्टीयार (४०), हिमांशू सोमय्या (३४), दिनेश यादव (२६) आणि सुनील शेट्टी (३५) अशी
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. जे सर्व व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. विलेपार्ले पोलिसांच्या हद्दीत चार घरफोड्यांची नोंद झाली
होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस
निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी
एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
त्यानुसार या पथकाने कॉल डेटा रेकॉर्ड, खबरी तसेच काही
तांत्रिक माहितीच्या आधारे या चौघांचा गाशा गुंडाळला. हे सर्व कांदिवली, विरार तसेच नालासोपारा परिसरात राहणारे आहेत. अटक करण्यात आलेल्या चौघांवर जवळपास दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत.
ज्यात कांदिवली, एमएचबी, अंबोली तसेच कस्तुरबा पोलीस ठाण्याचा समावेश असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या आरोपींचे अन्य काही साथीदारही असल्याची शक्यता आहे, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.